22.5 C
New York
Monday, July 22, 2024

Buy now

सावंतवाडी लायन्स क्लब अध्यक्षपदी अमेय पै ; सचिवपदी अभिजीत पणदुरकर

५ जुलैला मळगावात पदग्रहण सोहळा

सावंतवाडी : येथील लायन्स क्लब अध्यक्षपदी अमेय पै तर सचिवपदी अँड. अभिजीत पणदुरकर यांची निवड करण्यात आली आहे. ५ जुलैला मळगाव येथे आयोजित कार्यक्रमात ते पदग्रहण करणार आहेत, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत रिजन चेअरमन गजानन नाईक यांनी दिली. यावेळी माजी प्रांतपाल सुनील सुतार, जिल्हा समन्वयक अँड. विजय जमदग्नी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सावंतवाडी लायन्स क्लब या वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या पार्श्वभूमीवर वर्षभरात मेडिकल एड सेंटर, नेत्र शस्त्रक्रिया , पर्यावरण,युथ अवेरनेस असे विविध समाज हिताचे उपक्रम राबविले जाणार आहेत, असे नूतन अध्यक्ष अमेय पै आणि सचिव अँड.अभिजीत पणदूरकर यांनी सांगितले. रिजन चेअरमन गजानन नाईक यांनी प्रास्तविकात सावंतवाडी लायन्स क्लब हा १९७५ साली स्थापन होऊन आता ५० वर्षात पदार्पण करीत आहे. या वर्षासाठी लायन्स क्लबची नुतन कार्यकारणी निवडण्यात आली असून अध्यक्षपदी अमेय पै आणि सेक्रेटरीपदी अँड. अभिजीत पणदुरकर, खजिनदार पदी सुनील दळवी यांची निवड करण्यात आली आहे असे जाहीर केले. येत्या वर्षात लायन्स क्लबच्या प्रांतपालांच्या ॲक्शन प्लॅन नुसार विविध सामाजिक हिताचे कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. लायन्स क्लब तर्फे आरोंदा येथे मेडिकल एड सेंटर , हॉस्पिटल सारखा मोठा उपक्रम सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गरीब नेत्र रुग्णांची नेत्र तपासणी आणि आवश्यक तर नेत्र शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. रक्तदान, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांचे हिताचे विविध उपक्रम, जेष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय शिबिरे, महिलांसाठी युवतींसाठी तज्ञांचे मार्गदर्शन, पर्यावरणाचे दृष्टीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व जोपासना आदी कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत समाजोपयोगी काम करण आमचं ध्येय आहे. महिला, शालेय विद्यार्थी, गोरगरीब, दिव्यांग बांधव आदींसाठी विविध उपक्रम आम्ही राबविले आहेत. येत्या ५० वर्ष पुर्ती निमित्त देखील याच प्रकारचे विविध उपक्रम आम्ही हाती घेणार आहोत. युवकांची व्यसनाधीनतेतून मुक्ती, रोड सेफ्टीसाठी जनजागृती करण्याचा आमचा मानस आहे, असे मत अँड. अभिजीत पणदुरकर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी रविकांत सावंत, संदेश परब, महेश पाटील, बाळासाहेब बोर्डेकर आदी उपस्थित होते .

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!