3.7 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा

परशुराम उपरकरांच्या पत्रावर जिल्हाधिकाऱ्यांचे महामार्ग प्राधिकरणला निर्देश

कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचून खड्डेड् पडून अपघात होत आहेत. रस्त्याच्या कडेला पाणी थांबल्यामुळे अवजड गाड्या मातीमध्ये रुततात. त्यामुळे तुंबणारे पाणी गटार काढून ओहोळ किंवा नदीपात्रात सोडण्याची गरज आहे. खड्डे आणि पाणी साचल्याने वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे आपल्या उपस्थितीत आरटीओ विभाग, हायवे ठेकेदार, रोड सेफ्टीचे कर्मचारी, ठेकेदाराचे कर्मचारी यांची संयुक्त बैठक घेऊन सर्व सूचनांची अंमलबजावणी करावी अशा आशयाचे पत्र माजी आ. परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यावर जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी महामार्ग कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहून तातडीने उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशामध्ये राष्ट्रीय महामार्गावर झाराप ते खारेपाटण दरम्यान रस्त्याच्या बाजूची गटारे मारण्याबाबत तातडीने उपाययोजना करावी. ओसरगांव टोल नाका, जैतापकर कॉलनी रोड, कॉलनी समोरील ब्रीज, भंगसाळ नदी ब्रीज, आंबडपालकडून रस्त्यावर जाताना ब्रीज, कुडाळ सत्यम हॉटेलनजीकच्या सर्व्हिस रोडवर व अन्य ठिकाणी पाणी साचून अपघात झाले आहेत.

हुमरमळा येथे पुष्पसेन फार्मसी कॉलेजजवळ खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. हे खड्डे बुजवावेत, वळण बोर्ड, स्पीड लिमिट बोर्ड, गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांचे फलक तातडीने लावावेत. महामार्गावर अपघात झाल्यास ठेकेदाराने क्रेन व अॅम्ब्युलन्स उपलब्ध करावी. संबंधित यंत्रणांच्या फोन नंबरचे फलक लावावेत. असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी हायवे प्राधिकारणला दिले आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!