कणकवली तहसीलदार कार्यालयात सोमवारी मोठी गर्दी ; प्रशासनावर ताण येण्याची शक्यता
कणकवली | मयुर ठाकूर : मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण’ या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यामुळे सोमवारी येथील तहसीलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र व तहसीलदार कार्यालयातील आवारात, बाजूच्या झेरॉक्स सेंटर मधून सोमवारी सकाळपासून मोठ्या संख्येने लोकांची गर्दी पहायला मिळत होती. तर सदर योजनेसाठी लागणारे कागदपत्र जमा करण्यासाठी तसेच अर्ज घेण्यासाठी झुंबड उडाली होती. जर एका दिवसात एवढे दाखले अर्ज दिले गेले तर येणाऱ्या पंधरा दिवसात मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाल्यास प्रशासनावर ताण येण्याची शक्यता आहे.
सोमवारी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कणकवली येथील तहसीलदार कार्यालयात बऱ्याच महिला व त्यांच्या नातेवाईकांनी उत्पन्न दाखला, वय अधिवास दाखला तसेच अन्य कागपत्रांच्या पूर्ततेसाठी धाव घेतली होती.