कुडाळ : लोकांना व्यायमाबद्दल जागरूकता व्हावी , स्वतःच्या आरोग्याची काळजी त्यांनी घ्यावी, व्यायामाचे महत्व त्यांना समजावे यासाठी कुडाळ मान्सून रनचे आयोजन १४ जुलै रोजी करण्यात आले आहे.
जिल्ह्यात मॅराथॉन संस्कृती रुजावी लोकांना मॅराथॉनची आवड निर्माण व्हावी , जिल्ह्यातील लोकांना जिल्ह्याबाहेरील आणि स्थानिक मॅराथॉनपटू पाहायला मिळावेत ज्यामुळे नवीन पिढीला प्रेरणा मिळेल, आपले आरोग्य आपली जबाबदारी ही जाणीव सर्वसामान्य लोकांना होईल या उद्देशाने राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळ आणि टीम KMR यांच्यावतीने या मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी वापरण्यात येणाऱ्या जर्सीचा अनावरण सोहळा पार पडला.
पिंगुळी येथील पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे, चेतन गंगावणे यांच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या हस्त्ये या जर्सीचे अनावरण करण्यात आले. यावेळी आम्ही सर्वांनी ही पिंगुळीची कला देशात, जगभरात पोहोचवली तशीच ही कुडाळ मान्सून रनही मॅराथॉन स्पर्धा देशात नावाजली जाओ यासाठी तिचे वेगळेपण जपा, आपली कोकणातील लोक संस्कृती, लोककला त्यातून लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपला शारीरिक तंदुरुस्तीचा हा संदेश लोकांपर्यंत पोहचवा, आपण यात यशस्वी व्हाल अशी मनीषा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
याप्रसंगी कुडाळ मान्सूनरनचे आयोजक डॉ. जी. टी. राणे, डॉ जयसिंह रावराणे, डॉ.प्रशांत मडव, डॉ. प्रशांत सामंत, श्री अमित तेंडोलकर, रुपेश तेली, शिवप्रकाश राणे आदी उपस्थित होते. निळ्या रंगाची ही जर्सी ,कोकणातील पावसाळी वातावरणाच्या आनंदाची अनुभूती मिळविण्यासाठी शिव एंटरप्रायजेज् कुडाळ यांनी विशेष कष्ट घेतले.
तरी या मॅराथॉन स्पर्धेत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा निदान ५ किमी च्या फन रन मधे भाग घेवून पावसाळी स्पर्धेचा अनुभव घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नाव नोंदणीची शेवटची तारीख ८ जुलै आहे अशी माहिती आयोजकांनी दिली.