18.9 C
New York
Wednesday, April 30, 2025

Buy now

कळसुलीच्या रुजाय फर्नांडिस यांनी केले सलग पंधरा वेळा रक्तदान व एक वेळ प्लेटलेटदान

सर्वच स्तरातून रुजाय फर्नांडिस यांचे होतेय कौतुक

कणकवली : आर्थिक व सामाजिक स्वरूपात मदत करणारे अनेकजण असतात. मात्र एखाद्या रुग्णाला रक्तदान व प्लेटलेटची गरज असते त्याला मदत करणारे फार कमी असतात. याला अफवाद ठरलेत ते कणकवली कळसुली येथील रुजाय फर्नांडिस. रुजाय फर्नांडिस यांनी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान च्या माध्यमातून तब्बल पंधरा वेळा रक्तदान केले आहे तर एक वेळ प्लेटलेटदान करून, रक्ताची व प्लेटलेटची तातडीची गरज असलेल्या रुग्णांना जीवदान दिले आहे. त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

अनेकदा रुजाय फर्नांडिस हे उत्स्फूर्तपणे सामाजिक कार्यात सहभागी होतात. तसेच अनेक संस्थांशी संलग्न होऊन त्यांनी विशेषतः अनेकांच्या सामाजिक समस्या तसेच रक्ताची असलेली गरज पूर्ण केली आहे. रक्तदान करण्यासाठी त्यांनी गोवा – बांबोळी, एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटल पडवे, जिल्हा रुग्णालय ओरोस येथे अनेकदा रक्तदान केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!