केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वेधले लक्ष
सावंतवाडी : विमानतळ प्रकल्प हा सिंधुदूर्ग जिल्हा पर्यटन विकासाचा मानबिंदू आहे. सदरचे विमानतळ सुव्यवस्थितरित्या सुरू राहणे हे जिल्हयाच्या विकासाला अधिक गती देणारे आहे. सदय स्थितीत या प्रकल्पाचे सबलीकरण गरजेचे आहे. अशी मागणी माजी आमदार राजन तेली यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे.
त्यांनी दिलेल्य निवेदनात म्हटले आहे की चिपी विमानतळाला योग्य प्रतिसाद मिळवायचा असेल तर दरम्यानच्या परिसरात महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून उदयोग खात्यामार्फत एमआयडीसी निर्मितीला चालना मिळावी.तसेच परिसरातील शेतक-यांच्या संमतीने एखादी एमआयडीसी सुरू करता येईल का याची पाहणी करणे गरजेचे आहे. केंद्रसरकारच्या उड्डाण योजनेअंतर्गत आपल्याकडे ही विमानसेवा सुरू आहे. मुंबई ते चिपी तिकीट ४० टक्के कमी मध्ये उपलब्ध होत आहे. केंद्र सरकारकडे पुढील काही वर्षही विशेष सेवा चालू रहावी यासाठी प्रस्ताव मांडावा.