माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांचे प्रतिपादन
आ. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भिरवंडे खलांतर येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप
कणकवली | मयुर ठाकूर : प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच चांगले शैक्षणिक साहित्य मिळाल्यास शिक्षणाची आवड निर्माण होते. साहित्याचा उपयोग करून विध्यार्थ्यानी चांगले शिक्षण घ्यावे असे प्रतिपादन मा.जि.प अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी भिरवंडे गांधीनगर येथे आयोजित कार्यक्रमात केले.
कणकवली विधानसभा मतदार संघांचे आ. नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भिरवंडे आणि गांधीनगर ( खलांतर ) येथील प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मा.जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व मा.जि.प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या सौजण्याने सदरचे वाटप करण्यात आले.
यावेळी गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, भिरवंडे सोसायटीचे माजी चेअरमन संतोष सावंत शाळा व्यवस्थापण समिती चे अध्यक्ष मंगेश सावंत, श्रीकांत सावंत, मुख्याध्यापक श्री. गावकर शिक्षक, विध्यार्थी व पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. यापुढे देखील गावातील विध्यार्थ्यांना लागणारी मदत करण्यास आपण तयार असल्याचे संदेश सावंत यांनी सांगितले.