विद्यार्थ्यांना वह्यांचे केले वाटप ; शैक्षणिक वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा
कणकवली | मयुर ठाकूर : लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवलच्या माध्यमातून हळवल गावातील मुलांना वह्या वाटप करण्यात आले. हळवल येथील जिल्हा परिषदच्या तिन्ही शाळांमध्ये सुमारे शंभरहून अधिक मुलांना मंडळाच्या माध्यमातून वह्या वाटप करण्यात आले. लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. त्याचप्रमाणे यावर्षी देखील नवागतांचे स्वागत करून दहावी – बारावी च्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले.
शाळांमध्ये वह्या वाटप करताना सामाजिक बांधिलकी जपत मागील वीस वर्षे हे मंडळ सातत्याने कार्यरत आहे. अशा शब्दात उपस्थित मान्यवरांनी लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
यावेळी हळवल सरपंच अपर्णा चव्हाण, उपसरपंच प्रभाकर राणे, लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष लवू परब, माजी उपसरपंच अरुण राऊळ, ग्रामपंचायत सदस्य अनंत राणे, सचिन ठाकूर, जि. प. केंद्र शाळा हळवल नं. १ च्या मुख्याध्यपिका श्वेता मेस्त्री, शिवराम सुतार, स्वप्नील सावंत. वर्षा सरकारे, सौ.परब, श्री.गोसावी, श्री. जाधव, सौ. राणे, मंडळाचे उपाध्यक्ष भरत गावडे, सचिव दीपेश परब, खजिनदार गणेश गावडे, विकास गावडे, दिपक राऊळ, शिवा राणे, माजी उपसरपंच लक्ष्मण गावडे, सागर राणे, संदीप राणे, प्रथमेश राणे, आदी ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.