जनतेवर परत पैसे खाण्याचे, तुम्ही आरोप कराल तर परत तुम्हाला कोकणात आम्ही पाऊल ठेवू देणार नाही
आमदार नितेश राणे यांचा घणाघात
कणकवली | मयुर ठाकूर : लोकांनी शिवसेनेला नाकारलं हे सत्य खासदार नारायण राणे यांनी सांगितल. त्यामुळे संजय राऊत व विनायक राऊत यांना मिरच्या झोंबल्या. कोकणातला सामान्य मतदार हा पैसा खातो असं राऊत आणि ठाकरेंना वाटतं का ? आमचा कोकणी माणूस कधीही कोणाजवळ कर्ज मागत नाही. घेतलेले कर्ज त्वरित फेडतो. त्यामुळे आमच्या कोकणातील जनतेचा अपमान कोण करत असेल तर आमची जनता त्यांना गाडून टाकेल. उद्धव ठाकरेंना कोकणातील जनता समजली नाही असा प्रतिटोला देखील आ. नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. यावेळी ते कणकवली प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या विकास विरुद्ध प्रवृत्तीला जनतेने नाकारले आहे. सामान्य मतदारांचा अपमान करण्याचे काम उद्धव ठाकरेंचे कारटे करत आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी कोकणातील जनतेची माफी मागावी अन्यथा परत आम्ही कोकणात पाऊल ठेवायला देणार नाही, असा इशारा देखील आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
वायकर यांच्या विषयावर तीळपापड होत आहे. नेहमी कॉपी करुन पास होणाऱ्या उद्धव ठाकरेंना पारदर्शक निकाल समजला नाही. कोकणातील जनता बिकाऊ आहे असा आरोप करुन संजय राऊत ना आमच्या जनतेचा अपमान करायचा आहे का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, हे कपाळ करंटे लोक ह्यांना कोकणात पाऊल ठेवायला द्यायचं का हे जनतेने आता ठरवावे. ह्यांचे जिथे जिथे खासदार निवडून आले तिथे ईव्हीएम हॅक झाले असं आता आम्ही बोलायचं का ? असा सवाल देखील श्री. राणे यांनी उपस्थित केला. चायनीज मॉडेल असलेल्या संजय राऊत ना आता सगळं फेकच दिसणार. भाजपच्या कार्यालयात आम्हाला म्याव म्याव चा आवाज येत नाही. इलोन मस्कचा आधार घेण्यापेक्षा आदित्य ठाकरेंनी वरळी कडे द्यावे कारण तिथे आपली काय परिस्थिती झाली आहे हे पाहायला पाहिजे. केवळ ६००० वरच आपण पास झालेले आहात. त्यामुळे चार महिन्यानंतर हिंमत असेल तर वरळीमध्ये उभे राहून निवडून येऊन दाखवा, असे आवाहन देखील आ. राणे यांनी आदित्य ठाकरेंना दिले आहे. तुमच्या मानेवर बसून १ वरून काँग्रेस १३ वर गेलीय आणि तुम्ही २१ वरून ९ वर आलेले आहात. हे जेव्हा आदित्य ठाकरेंना कळेल तेव्हा उबाठा ला चांगले दिवस येतील असेही आ. राणे म्हणाले. ईव्हीएम च्या नावाने शेमड्या सारखं रडणं आव्हाड ह्यांची सवय झाली आहे.
प्रत्येक पक्षात असलेले अतिउत्साही कार्यकर्ते बॅनर लावतात त्याची दाखल घेतली जाईल. दीपक केसरकर यांनी दखल घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काही उबाठा प्रेमी घुसलेले आहेत. त्यांना दूर करावं अशी मागणी देखील अगदी नावाच्या यादी साहित केलेली असल्याचे आ. नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचबरोबर रोहित पवार हे स्वतः अजित पवारांच्या संपर्कात आहेत. मंत्रिपदसाठी, ते अजित पवारांच्या बाजुला असतील. त्यामुळे ते दुसऱ्यांची माहिती देत देत कधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येतील हे समजणार देखील नाही. तसेच बाबरी मशीद अशा प्रकारचा उल्लेख आमच्या शालेय पाठयपुस्तकांत होता कामा नये, मुलांना हिंदू संस्कार मिळावेत, बाबरी किंवा औरंग्या इतरांचे उल्लेख आमच्या पाठ्यपुस्तकात नकोत. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत असेही ते म्हणाले.