21.2 C
New York
Wednesday, April 1, 2026

Buy now

कोल्हापुरातील शाहूपुरी तिसऱ्या गल्लीमधील डॉ. सतीश पत्की हॉस्पिटलसमोर विचित्र अपघात

कोल्हापूर : कोल्हापुरातील शाहूपुरी तिसऱ्या गल्लीमधील डॉ. सतीश पत्की हॉस्पिटलसमोर विचित्र अपघात झाला. सुदैवाने यात कोणाचीही जीवितहानी झाली नसून दोघे किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली. डॉ. सतीश पत्की हॉस्पिटलसमोर एका रिक्षाने दुचाकीवरील दोघांना तर ये – जा करणाऱ्या दोघांना धडक दिली यात दोघे किरकोळ जखमी झालेत. यावेळी रिक्षा यूटर्न घेत असताना अचानक रिक्षा गोलगोल फिरू लागली. त्यामुळे तेथील लोक एकदमच चक्रावले. काही वेळानंतर रिक्षा थांबलेल्या दुचाकीला धडकली आणि रिक्षा अखेर थांबली. त्यामुळे पुढील अनर्थ वेळीच टळलाय. हा सर्व अपघात सीसीटीव्हीत कैद झाला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!