-0.2 C
New York
Saturday, February 15, 2025

Buy now

माजी खासदार डॉ. निलेश राणे यांचा समाज रत्न पुरस्कार देऊन गौरव

सावंतवाडी : मराठा समाजाच्या अडचणीच्या वेळी नेहमी धावून येणारे मराठा समाजाचे लढवय्ये नेते व सावंतवाडी सकल मराठा समाजाला सर्वतोपरी मदत करणारे माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांचा आज शाल श्रीफळ व समाज रत्न पुरस्कार देऊन माजी पंचायत समिती सदस्य केसरी गावचे मानकरी शिवसेना तालुका संघटक व मराठा समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक राघोजी भगवान सावंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला .

माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सर्वप्रथम मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळवून दिले या लढाईत नारायण राणे यांचे संपूर्ण कुटुंब मराठा समाजाबरोबर होते हे मराठा समाज कधीही विसरणार नाही असे मराठा समाजाचे अध्यक्ष सिताराम गावडे यांनी स्पष्ट केले. निलेश राणे यांनी अनेक वेळा जेव्हा जातीवाचक प्रकरणात मराठा समाजाला गुंतवण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना चुकीचे काही करू नका जर आमचा मराठा खराच दोषी असेल तर तुम्ही बिनधास्त कारवाई करा मात्र चुकीचे काही झाल्यास आम्ही शांत बसणार नाही असा समाजाच्या वतीने इशारा दिला होता ,त्यामुळे माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांच्या कडे मराठा समाजाचे एक आधारावड म्हणून पाहिले जाते म्हणून त्यांचा आज दहावी बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाच्या वेळी समाज रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी माजी खासदार डॉक्टर निलेश आणि आपला हा सत्कार एका ज्येष्ठ मराठा समाजाच्या सदस्या मार्फत होत असल्याने मला त्याचा आनंद आहे भविष्यात मराठा समाजासाठी लागेल ती मदत करायला केव्हाही मी पुढे असेन असे उपस्थितांना आश्वासित केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!