25.5 C
New York
Saturday, April 19, 2025

Buy now

सावंतवाडी पोलीस निरीक्षकांना मनसेचे निवेदन

तालुक्यातील अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करा ; अन्यथा जनआंदोलन

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये गोवा बनावटीची दारू राजरोस पण विकली जात आहे. याबाबत आपल्या कडे वारंवार तक्रार केली आहे. परंतु आपल्या कडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्याच प्रमाणे प्रत्येक गावा मध्ये बाजार पेठे मध्ये बिनधास्त मटका घेतला जातो. त्यामुळे तात्काळ अवैध धंद्यांवर कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या वतीने आज सावंतवाडी पोलीस निरीक्षकांकडे निवेदनद्वारे केली आहे.

दरम्यान सावंतवाडी तालुक्यातील काही भागामध्ये राजरोस पणे गांजा व अंमली पदार्थ विक्री होत आहे. या सर्व गोष्टी येणाऱ्या काळात तरुण पिढी करीता घातक ठरू शकतात व तरुण पिढी बरबाद होऊ शकते. या विषयाकडे आपण गांभीर्याने बघावे व येत्या १५ दिवसात कडक कारवाई करावी. अन्यथा हा जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठे जनआंदोलन सावंतवाडी तालुक्यात मध्ये उभारेल. आणि याला सरस्वी आपण जबाबदार राहील असा इशारा देखील मनसेच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!