29.7 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

कणकवली जाणवली येथे आज पुन्हा अपघात

मिडलकटवर वळत असताना झाला अपघात ; दुचाकीस्वार जखमी

कणकवली : मिडल कटवरून वळत असताना दुचाकीला कारची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकी वरील दोघेजण जखमी झाले. यातील दुचाकी वरील एकाचा पाय फ्रॅक्चर झाला असून, त्याला अधिक उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात शुक्रवारी (आज) दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास जानवली हॉटेल नीलम कंट्रीसाईड जवळील मिडलकट जवळ घडला. अपघातानंतर वाहतूक पोलीस राजेश पाटील यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

रुग्णवाहिकेमार्फत जखमी दुचाकीस्वाराला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. जानवली मध्ये एकाच गावामध्ये तब्बल ९ अनधिकृत मिडलकट असून या मिडल कटमुळे अनेकदा अपघात झाले आहेत. मात्र याबाबत कोणत्याही ठोस उपाय – योजना होत नसल्याने हे वारंवार मिडल कट अपघातास कारणीभूत ठरत आहेत.

गोव्याच्या दिशेने जाताना मिडल कट मधून वळत असताना दुचाकीची या कारला धडक बसली. या मिडलकट मधून कार गोव्याच्या दिशेने वळत होती. मात्र दुचाकी स्वाराला दुचाकीवर नियंत्रण ठेवता न आल्याने त्याची कारच्या साईटला जोरदार धडक बसली. या मिडलकटमुळे यापूर्वी देखील येथे अनेकदा अपघात झाले आहेत. त्यामुळे संबंधीत यंत्रणा या मिडलकट वर काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!