कणकवली : मालवण – आचरा येथून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या बस क्रमांक ( एम एच २० बीएल १२०६ ) कणकवली – आगार ला श्रावण येथे आल्यावर अपघात झाला. शुक्रवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात चालक अण्णासाहेब मंगेश बुटाले ( रा. बिडवाडी, वय – ४० ) हे जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर बस मधून प्रवास करणारे अरुण अण्णाजी नाईक – साटम ( वय – ५५ रा. घोडगे ), संजय विठोबा घाडीगांवकर ( वय – ४९ रा. कुडोपी ), समृद्धी संजय घाडीगांवकर ( वय – ४७ रा. कुडोपी ), अरुणा जितेंद्र जावकर ( वय – ४१ रा. वायंगणी आचरा ), जितेंद्र विठ्ठल जावकर ( वय – ४५ रा. वायंगणी आचरा ) हे किरकोळ जखमी झाले होते. जखमीना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
अपघातात प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र बसच्या स्टेअरिंग चे रॉड तुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समजली. स्टेअरिंग रॉड तुटल्याने बसवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे बस रस्त्याशेजारील आंब्याच्या झाडावर आदळली. यात बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.