कणकवली : नाटळ ग्रामसभेत मंगळवारी दुपारी भाजप व उद्धवसेना गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होत मारहाणीची घटना घडली होती. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी परस्परविरोधी तक्रारी कणकवली पोलिस ठाण्यात दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही गटाच्या वीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
उद्धवसेनेचे नाटळ तंटामुक्ती अध्यक्ष गणेश मारुती सावंत (३४, रा. नाटळ खांदारेवाडी) यांच्या तक्रारीवरून गावातील भाजपच्या १० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संशयित सुनील शंकर घाडीगावकर, पंढरीनाथ तायशेटे, नंदकिशोर सावंत, गोपाळ कुडतडकर राजेश गावकर, महेंद्र गुडेकर, किशोर परब, दत्ताराम खरात, प्रवीण पाताडे दीनानाथ सावंत (सर्व रा. नाटळ) यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दिनानाथ पंढरीनाथ सावंत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गणेश मारुती सावंत, ऋषिकेश मारुती सावंत क्रिमेन चोडणकर, रमाकांत लक्ष्मणा घाडीगावकर, पद्माकर गणेश पांगम सचिन पांडुरंग सावंत, अभिषण शामराव सावंत, सुनील संतोष जाधव, पंढरीनाथ हरी पांगम, संजय शांताराम सावंत (सर्व राहणार नाटळ) यांच्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.