29.7 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

महायुतीच्यावतीने कुडाळात नारायण राणेंच्या विजयानंतर जल्लोष

कुडाळ : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा येथील गांधीचौक परिसरात फटाके फोडून विजयोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी “महायुतीचा विजय असो” “नारायण राणे साहेबांचा विजय असो” असा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे कार्याध्यक्ष हेमंत उर्फ काका कुडाळकर, शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, शिवसेना प्रवक्ता रत्नाकर जोशी, मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, मनसे तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, प्रथमेश धुरी, यतीन माजगावकर, अक्षय जोशी, शिवसेना माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, शिवसेना विभागप्रमुख जयदीप तुळसकर, विठ्ठल शेडगे, शिवसेना तालुका संघटक अनिकेत तेंडोलकर, महिला युवतीसेना तालुकाप्रमुख गायत्री गोलम, शिवसेना महिला आघाडी उपतालुकाप्रमुख अनघा रांगणेकर, महिला आघाडी उपविभागप्रमुख आशू अग्रवाल, शिवसैनिक मयूर अग्रवाल आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!