13 C
New York
Sunday, October 13, 2024

Buy now

रत्नागिरी सिंधुदुर्ग चे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचे कणकवली पटवर्धन चौकात जल्लोषात स्वागत

कणकवली | मयुर ठाकूर : लोकसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर नवनिर्वाचित खासदार ना. नारायण राणे हे रत्नागिरी येथून कणकवली येथे दाखल झाले. कणकवली येथील पटवर्धन चौकात ना. नारायण राणे यांचे ढोल ताशांसह फटाक्यांच्या अतिषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले. सर्वत्र गुलाल उधळून ना. नारायण राणे यांच्या विजयाचा विजयोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, आशिये सरपंच महेश गुरव, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत, सुप्रिया नलावडे, प्रतीक्षा सावंत , प्रज्ञा ढवण, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, बबलू सावंत, निखिल आचरेकर, संजना सदडेकर यांच्यासह अन्य भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी ना. नारायण राणे यांना पुष्पहार देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांतनर कणकवली बाजारपेठेतून रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने व उत्साहाने सहभागी झाले होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!