22 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली …. पोलीस व्हॅनला लक्झरीची धडक

दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान ; जखमींवर उपचार सुरू

कणकवली : ओरोसहुन राधानगरी च्या दिशेने जाणाऱ्या सिंधुदुर्ग पोलिसांच्या ( एम एच ०७ जि २२४२ ) या व्हॅनला कोल्हापूरवरून येणाऱ्या इंटरसिटी लक्झरी बस ( एम एच ०४ केयू ०७१६ ) ची धडक बसून अपघात झाला. या अपघातात पोलीस व्हॅन चालक तृप्ती मुळीक यांच्यासह अन्य तिघे कर्मचारी जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी सकाळी ७ वाजता घडला. फोंडाघाट येथील मुख्य धबधब्याजवळ येथील तीव्र वळणावर हा अपघात झाला. या अपघातात चालक तृप्ती मुळीक, हवालदार पाडळकर, कदम, निवतकर जखमी झाले आहेत. अपघातात पोलीस व्हॅनचे मोठे नुकसान झाले असून दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने जीवितहानी टळली.

दरम्यान फोंडाघाट येथील चेतन चायनीज सेंटर चे मालक ओंकार विठ्ठल पिळणकर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी फोंडाघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर सर्व जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!