17 C
New York
Saturday, April 19, 2025

Buy now

सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शिक्षक यांचा सन्मान

ज्यांनी आम्हाला प्राथमिक शिक्षण देऊन घडविले त्यांचा सन्मान करणे, हे आमचे कर्तव्यच

राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचे प्रतिपादन

कणकवली | मयुर ठाकूर : माऊली मित्र मंडळाचे वतीने संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या हस्ते उत्तम आनंदा सुर्यवंशी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी माऊली मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य अविनाश गावडे, सुभाष उबाळे उपस्थित होते सुर्यवंशी गुरूजी यांच्या पत्नी, आई, सौ वैशाली सामंत सुर्यवंशी उपस्थित होत्या यावेळी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी सुर्यवंशी गुरूजी बद्दल गौरवोद्गार व्यक्त करताना असे म्हटले की, १९८९ साली प्राथमिक शिक्षण देऊन असंख्य विद्यार्थी घडविले, २००८ साली गुरूजींनी मुख्याध्यापक म्हणून , तसेच २००९ साली केंद्रप्रमुख म्हणून आदर्शवत शिक्षणाची सेवा गेली ३५ वर्षे विद्यार्थी घडविण्यासाठी आपले आयुष्य वेचले अशा या थोर व्यक्तिमत्वाला सन्मानित करताना आम्हाला विषेश आनंद होत आहे, असेही पेडणेकर म्हणाले. माऊली मित्र मंडळाचे उपस्थित पदाधिकारी व सदस्य यांनी सुर्यवंशी गुरूजींना भावी वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!