24.6 C
New York
Saturday, August 30, 2025

Buy now

बारावीचा विद्यार्थी बेपत्ता, रोकड गायब

कणकवली : तालुक्यातील एका गावातील बारावीत शिकणारा १७ वर्षीय मुलगा बेपत्ता झाला आहे. त्याबाबत कणकवली पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. तो मुलगा शनिवारी दुपारपासून बेपत्ता झाला असून त्याला कुणीतरी फूस लावून पळविल्याची तक्रार त्याच्या आईने पोलिस ठाण्यात दिली आहे.

या तक्रारीनुसार तो मुलगा रत्नागिरी जिल्ह्यातील मूळ रहिवासी असून त्याची आई कणकवली तालुक्यात एका गावात कामाला आहे. त्यामुळे तो आईसह तेथे राहतो. शनिवारी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास काही ३:३० वाजण्याच्या सुमारास तिला कामानिमित्त आई घराबाहेर पडली, तेव्हा मुलगा घरीच होता. मात्र, दुपारी मुलाच्या मित्राचा फोन आला. तिच्या मुलाचा फोन लागत नसल्याचे त्याने सांगितले. सायंकाळी घरी आल्यानंतर तिने पाहीले असता ती राहत असलेल्या घराला कुलूप होते. कपाटात ठेवलेली १३ हजार ५०० रुपयांची रक्कम तिला आढळून आली नाही. तर कुटुंबीय, नातेवाइकांकडे चौकशी करूनही मुलगा न सापडल्याने तिने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!