कणकवली | मयुर ठाकूर : हळवल गावाची सुकन्या व हळवलचे माजी सरपंच रवींद्र परब यांची मुलगी ऋतुजा परब हिने पंचक्रोशीत तसेच शिवडाव हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत प्रथम येण्याचा मान मिळवला. तसेच हळवल गावचे नाव मोठे केले. त्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सत्कार व अभिनंदन करण्यात आले. शिवसेना उपतालुकाप्रमुख राजू राणे यांच्या हस्ते तिला शुभेच्छा देण्यात आल्या. ऋतुजाचे वडील रवींद्र परब, युवासेना विभागप्रमुख रोहित राणे, शाखाप्रमुख अनंत राणे, माजी ग्रा.पं. सदस्य प्रभाकर चव्हाण, विठोबा ठाकूर, रवी परब, राजन तांबे व शिवसैनिक उपस्थित होते.