28.4 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

मुंबई – गोवा महामार्गावर वागदे येथे इनोव्हा कारची दुचाकीला धडक ; दुचाकीस्वार गंभीर जखमी

पोलीस घटनास्थळी दाखल

कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर वागदे उभादेव या ठिकाणी वागदे येथून कणकवली बाजारपेठच्या दिशेने जाणाऱ्या बजाज कंपनीची डिस्कवर ( एमएच ०७ झेड ०५५९ ) गाडीला गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी इनोव्हा कार क्रमांक ( एमएच ०९ सीएस ७००३ ) ने मागाहून दुचाकीला डाव्या बाजूने धडक दिली. याबाबत प्रत्यक्ष दर्शनी सांगितले की, मोटरसायकल स्वार हे डाव्या बाजूच्या दिशेने कणकवलीच्या दिशेने चालले होते. मात्र मागून येणाऱ्या इनोव्हा कारने जोरदार धडक दिल्याने साधारणपणे मोटरसायकलस्वार १५ ते २० फूट फरफटत गेला.

यावेळी अपघातात मोटरसायकलस्वाराच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. यावेळी अपघातग्रस्त जखमिला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती समजताच महामार्ग वाहतूक पोलीस श्री. गोसावी, श्री. चिंदरकर तसेच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रुपेश गुरव, चंद्रकांत माने, पोलीस पाटील सुनिल कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!