16.1 C
New York
Wednesday, May 14, 2025

Buy now

वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण यांचा असाही प्रमाणिकपणा

हरवलेला मोबाईल मालकाला केला परत

कणकवली | मयुर ठाकूर : अलीकडे पैश्याच्या पाकिटाप्रमाणे मोबाईल मारण्यासारख्या गोष्टी घडत असतात. प्रत्येक वेळी मोबाईल चोरीलाच जातात असे नाही. काही वेळा मोबाईल किशत ठेवत असताना खाली पडतो. कणकवली शहरात आज असाच एक प्रकार घडला. रामचंद्र शंकर बोभाटे (वय ७५ रा. तोंडवली बोभाटेवाडी ) हे कणकवली पटवर्धन चौकात आले होते. दरम्यान त्यांच्या किशातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल पडला. त्यांनी शोधाशोध केली मात्र तो मोबाईल त्यांना सापडला नाही.

नेहेमीप्रमाणे येथे ड्युटीवर असलेले वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण हे ड्युटीवर पटवर्धन चौकात आले असता त्यांना सदर सॅमसंग कंपनीचा मोबाईल सापडला. लागलीच श्री. चव्हाण यांनी मोबाईलची शोधाशोध करणाऱ्या ७५ वर्षीय आजोबांना शोधून तो मोबाईल रामचंद्र बोभाटे यांना खात्री करून ताब्यात दिला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!