0.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

शंकर महादेव विद्यालय कुंभवडे प्रशालेचा माध्यमिक शालांत परीक्षा २०२४ मध्ये १००% निकाल

कणकवली | मयुर ठाकूर : शंकर महादेव विद्यालय कुंभवडे प्रशालेचा माध्यमिक शाळांत परीक्षा २०२४ मध्ये १००% निकाल लागला असून आयुष महादेव सावंत याने ८७.४०% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला तर सुमित सुधाकर घाडीगावकर याने ८१.२०% गुण मिळवून द्वितीय व सरिता सुनील सावंत यांनी ७९.४०% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर प्रशालेतील एकूण १७ विद्यार्थी माध्यमिक शालांत परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका अपूर्व सावंत व ॲड. राजेंद्र रावराणे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!