13 C
New York
Tuesday, October 14, 2025

Buy now

गळफास लावून युवकाची आत्महत्या

कणकवली : तालुक्यातील कलमठ लांजेवाडी येथील प्रशांत दयानंद पाष्टे (वय २७ ) याने आपल्या घराशेजारील असलेल्या दुकानात गळफास लावून आत्महत्या केली. प्रशांत हा आपल्या दुकानात रात्री झोपत असे, त्या प्रमाणे सोमवारी २७ मे रोजी तो नेहेमीप्रमाणे दुकानात झोपण्याकरिता गेला होता. मंगळवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी गेले असता त्याचा मृतदेह आढळून आला. दुकानच्या छप्पराच्या लोखंडी अँगलाला प्रशांत गळफास लावलेला स्थितीत आढळून आला. प्रशांतच्या आत्महत्येची घटना समजताच त्याच्या कुटुंबियांसह कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्यासह आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मिलिंद देसाई यांनी घटनेचा पंचनामा केला. प्रशांतच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!