28.4 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

वीज वहिनी तुटून पडली अंगावर | महिलेचा मृत्यू ; ग्रामस्थ आक्रमक

बांदा : महिलेच्या अंगावर वीज वाहिनी तुटून पडल्यामुळे “ती” जागीच ठार झाली. ही घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कुंभारदेवणे परिसरात घडली. विद्या वामन बिले (वय ६०) असे तिचे नाव आहे. त्या परिसरातील ओहळात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी हा प्रकार घडला. दरम्यान या प्रकाराबाबत बांदा येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत वीज वितरण च्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. या घटनेला वीज वितरण कंपनी जबाबदार आहे. त्यामुळे संबंधित महिलेला १० लाखाची भरपाई द्या, अन्यथा मृतदेह सावंतवाडीच्या कार्यालयात नेऊन ठेवू, असा इशारा दिला आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!