20.3 C
New York
Sunday, September 14, 2025

Buy now

कणकवलीत घिरट्या घालणाऱ्या विमानाची चर्चा | प्रशासनाला देखील माहिती नसल्याचे उघड

कणकवली : कणकवली शहरासह लगतच्या कलमठ, वागदे, जानवली, हळवल या गावांच्या परिसरात छोट्या विमानाची गस्त सुरू होती. पाच ते दहा मिनिटांच्या फरकाने हे विमान घिरट्या घालत असल्‍याने शहर तसेच तालुक्‍यातील नागरिकांमध्ये मोठी चर्चा होती. वेंगुर्लेतील बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हे विमान आले असल्‍याचीही चर्चा होती. मात्र जिल्‍हा प्रशासनाने ही शक्‍यता फेटाळून लावली. दरम्‍यान सातत्‍याने हे छोटे विमान शहर आणि लगतच्या गावांवरून फिरत असल्‍याने नागरिकांनीही विमानाची छबी मोबाईल मध्ये टिपली. याबाबत प्रशासनाच्या अनेक विभागांशी संपर्क साधला असता या विमानाच्या फेऱ्यांबाबत काहीही माहिती नसल्‍याचे स्पष्‍ट करण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!