1.9 C
New York
Wednesday, December 17, 2025

Buy now

ओरोस येथे वीज गायब तर रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक ठप्प

ओरोस : बुधवारी संध्याकाळी सवा पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सिंधुदुर्गनगरीत मोठ्या प्रमाणात झाडे मोडून आणि मुळासकट रस्त्यावर कोसळल्याने येथील वाहतूक बंद झाली होती. तसेच ओरोस फाटा येथील दुकानांचे पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.

सुदैवाने झाडे रस्त्यावर कोसळली त्यावेळी वाहने किंवा माणसे नव्हती. त्यामुळे मोठी हानी टळली. या शिवाय विद्युत खांब कोसळण्याचे प्रकार सुद्धा घडले आहेत. यामुळे जिल्हा मुख्यालयातील वीज गायब झाली आहे. सुमारे तासभर वीज, पाऊस आणि वारा यांचा तांडव सुरू होता.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!