29.7 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

हळवल परबवाडी येथील नुकसानग्रस्त घरांची खा. विनायक राऊत, संदेश पारकर यांनी केली पहाणी

कणकवली : खासदार विनायक राऊत यांनी हळवल परबवाडी येथे वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी केली. यावेळी श्री. राऊत यांनी नुकसानग्रस्त भागाची पहाणी करून नुकसानग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर देखील उपस्थित होते. वादळी वाऱ्यांने पडझड झालेल्या भागाची पहाणी केल्यानंतर सर्कल अधिकारी, ग्रामसेवक यांच्यासोबत शासकीय मदतीबाबत चर्चा केली. तर आपणही नुकसानग्रस्त नागरिकांना प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता मदत देणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

यावेळी हळवल गावातील समस्येचा बनलेला विषय म्हणजे लाईट. याबाबत देखील संबंधीत अधिकाऱ्यांसोबत बोलून परत अस होता नये यासाठी प्रयत्न करतो, असेही ते म्हणाले.

हळवल परबवाडी येथे वादळी पावसात पडझड झालेल्या घरांची प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत माहिती घेताना खा. विनायक राऊत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर आदी.

तसेच ग्रामपंचायत सदस्य रोहित राणे यांनी हळवल गावातील वादळी पावसाने पडझड झालेल्या भागाची माहिती दिली. तसेच याठिकाणी झाडे पडून नुकसान झाले तर ती कट करण्यासाठी देखील येथील प्रशासनाकडे कोणता पर्याय नाहीय. तसेच महावितरण च्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी केली.

यावेळी त्यांच्यासोबत हळवल ग्रामपंचायत चे सदस्य रोहित राणे, अनंत राणे, विजय परब, कमलाकर तांबे, आप्पा ठाकूर, श्री. परब आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!