कणकवली | मयुर ठाकूर : गुरुवारी कणकवलीत तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला होता. यामुळे कणकवली तालुक्यातील हरकुळ गावातील शेखवाडी व खडकवाडी येथील दोन वाड्यांमधील घरांचे मोठे नुकसान झाले होते. कणकवली – देवगड – वैभववाडीचे लोकप्रिय आणि जनतेसाठी नेहेमीच ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता आहे, त्या परिस्थितीत घटनास्थळी पोहोचून जनतेला मदत करणारे आमदार नितेश राणे यांनी हरकुळ येथे वादळी वाऱ्यात नुकसानग्रस्त झालेल्या ग्रामस्थांना भेट दिली व नुकसान झालेल्या भागाची प्रत्येक ठिकाणी जाऊन पहाणी केली. यावेळी हरकुळ येथील ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार देखील मानले. तसेच जबाबदारी म्हणून आम्ही ग्रामस्थ देखील तुमच्या सोबत असू असा विश्वास ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांना दिला.

यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, बुलंद पटेल यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आ. नितेश राणे म्हणाले, तालुक्यात झालेल्या वादळ पावसामुळे जे काही नुकसान झालेलं त्याचे प्रशासन व महावितरण विभागाच्या माध्यमातून जे काही पंचनामे केले. आणि सर्व नुकसानाचा आढावा घेतला. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही तातडीची मदत उपलब्ध करून दिली आहे. प्रामुख्याने तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी जे काही सहकाऱ्यांसमवेत कार्यप्रणाली राबवून पंचनामे केले. त्याप्रमाणे नुकसान भरपाईची जि काही मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य सरकारकडे केलेली आहे. त्याचा पाठपुरावा करून पालकमंत्री रवींद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून इकडे झालेलं नुकसान स्पेशल केस म्हणून जास्तीत जास्त नुकसान भरपाई जास्तीत जास्त लोकांना कशी मिळवून देता येईल यासाठी याकरिता आम्ही पाऊले टाकणार आहोत, असेही ते म्हणाले.


