देवगड : देवगड आठवडी बाजारात वाहतूक कोंडीचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागला आठवडा बाजार आणि पर्यटकांची वाढलेली गर्दी यामुळे बाजारपेठेत वाहतूक कोंडी जाणवली वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.मात्र वाहन चालक बेशिस्तपणे वाहन चालवत असल्यामुळे वाहतूक पोलीस विशाल वैजल यांना तारेवरची कसरत करावी लागत होती.यावेळी अनेकांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली मात्र नगरपंचायत प्रशासनाने यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. अशी ही मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.
देवगड जामसंडे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. सध्या स्थितीत शहरात मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आंबे विक्री, तसेच मुख्य बाजारपेठेमध्ये खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने मुख्य बाजारपेठेत प्रवासी भरण्यासाठी उभी केल्यामुळे तसेच शहरात मोठ्या प्रमाणात पर्यटक देखील दाखल झाले आहेत.आणि त्यांच्याकडून वाहने रस्त्याच्या दुतर्फास बेशिस्तपणे लावत असल्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.एकूणच यामुळे वाहतुकी दरम्यान एखादे मोठे वाहन आल्यास वाहतूक कोंडी निर्माण होते यामुळे शहरात वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी अजून वाहतूक पोलिसांची गरज जाणवते आणखीन १५ ते २० दिवस पर्यटकांची वर्दळ असणार आहे.असे येथील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना जाणवणार आहे.
या कालावधीत मांजरेकर नका कॉलेज रोड तसेच जामसंडे बाजारपेठ येथे वाहतूक पोलीस तैनात केल्यास ही कोंडी नियंत्रणात आणण्यास मदत होऊ शकते असे त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात नगरपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाने तोडगा काढणे गरजेचे आहे.