26 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

मोटारसायकल बस अपघात | दोंघांचा मृत्यू ; एक गंभीर जखमी

मालवण : मोटरसायकल व एसटी बस यांच्यात बुधवारी रात्री आनंदव्हाळ येथे अपघात घडला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची नोंद मालवण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

मालवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मालवण कसाल मार्गांवर आनंदव्हाळ भगवती हॉटेल नजीक वळणावर मालवणच्या दिशेने येणाऱ्या रत्नागिरी मालवण (एमएच २० बीइल ३१८५) या बसला समोरून भरधाव वेगात येणाऱ्या मोटरसायकल (एमएच ०७ एक्यू २५६८) ची धडक बसली. एसटी बसला एका बाजूला धडक देऊन मोटरसायकल रस्त्यावर कोसळली. मोटरसायकलवर बसलेले तिघेही जण रस्त्यावर कोसळले. एसटी चालक, वाहक तसेच स्थानिक ग्रामस्थ यांनी धाव घेतली. रुग्णावाहिकेला बोलावून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमीना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मालवण पोलीस व एसटी प्रशासन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचा पंचनामा करण्यात आला.

गंभीर जखमी मोटरसायकल चालक गणेश कृष्णा निकम (वय ३०) रा. पोईप यांचा बुधवारी रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर अन्य एक गंभीर जखमी राकेश पवार (वय ३०) रा. कुंभारमाठ याचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. तर सुनील शिवराम पवार (वय२५ रा. कोटकमटे ता. देवगड या जखमी तरुणावर गोवा येथे उपचार सूरू आहेत. अशी माहिती मालवण पोलिसांच्या वतीने देण्यात आली. भरधाव वेगात मोटरसायकल चालवून अपघातात स्वतःच्या मृत्यूस तसेच मोटरसायकल वरील अन्य एका व्यक्तीच्या मृत्यूस व मोटरसायकल वरील अन्य एका व्यक्तीच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मोटरसायकल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालवण पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!