कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली येथील ‘अखंडलोकमंच’ जिल्हा सिंधुदुर्ग संस्थेच्यावतीने १८ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजता कणकवली नगर वाचनालयाच्या सभागृहात ग़ज़लनवाज भीमराव पांचाळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.”गझलची सांगितीक अभिव्यक्ती” या विषयावर ते व्याख्यान देणार आहे.अखंड व्याख्यानमालेचे हे तिसरे पर्व आहे.
अखंड समाज रचनेच्या निर्मितीसाठी समाजाभिमुख विचारधारा तळागाळात रुजावी यासाठी वैचारिक क्रांतीची मांडणी करणारी ‘अखंड व्याख्यानमाला’ गेल्या वर्षीपासून अखंडलोकमंच संस्थेच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे पहिले विचार ज्येष्ठ लेखक आ. ह. साळुंखे यांनी मांडले होते.तर दुसरे व्याख्यान ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी दिले होते. आता ग़ज़लनवाज भीमराव पांचाळे हे तिसरे विचार पुष्प गुंफनार आहेत. मोफत प्रवेश असलेल्या हा व्याख्यानाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अखंड लोकमंच चे अध्यक्ष नामानंद मोडक यांनी केले आहे.