23.7 C
New York
Thursday, July 25, 2024

Buy now

कारला दुचाकीची धडक ; दुचाकीस्वार व मागे बसलेली महिला जखमी

कणकवली : गोव्याहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या कारला लोरे नं. १ येथील एका वळणावर समोरून येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार व त्यांच्या मागे बसलेली महिला जखमी झाली. हा अपघात मंगळवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास झाला.

सोलापूर येथील काही मित्रांचा ग्रुप आपल्या ताब्यातील कार घेऊन गोवा येथे पर्यटनासाठी गेले होते. तेथून मंगळवारी परत सोलापूरच्या दिशेने जात असताना लोरे नं. १ येथील वळणावर वळताना समोरून येणारी दुचाकी कारला धडकली. यात दुचाकी स्वराच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या मागे बसलेल्या महिलेलाही दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना कणकवलीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर सोलापूर येथील पर्यटकांनी कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेतली असून दुचाकीस्वाराविरोधात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!