26.4 C
New York
Saturday, September 14, 2024

Buy now

सुज्ञ मतदारांनी विचारपूर्वक मतदान केले असल्याने या मतदारसंघातील निकाल अनपेक्षित लागण्याची शक्यता – परशुराम उपकर

कणकवली | मयुर ठाकूर : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाला बॅ. नाथ पै, मधू दंडवते यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा लाभला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या उमेदवारांसह अन्य उमेदवारांनी मतदारांना पैशांचे वाटप करून चुकीचा पायंडा पाडला. मात्र, सुज्ञ मतदारांनी विचारपूर्वक मतदान केले असल्याने या मतदारसंघातील निकाल अनपेक्षित लागण्याची शक्यता आहे. तसेच महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी पालकमंत्री फिरले नाहीत, अशी टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली.

येथील संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. उपरकर बोलत होते. उपरकर म्हणाले, २०१४ व २०१९ साली रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढविण्यात आली होती. मात्र, २०२४ लोकसभा विकासाच्या मुद्द्यावर उमेदवारांनी लढविली नाही. या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या उमेदवारांसह अन्य उमेदवारांनी मतदारांना पैशांचे वाटप करण्यात आले. मात्र, सुज्ञ मतदारांनी विचारपूर्वक मतदान केले आहे. त्यामुळे अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील विकासाची कामे अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांसाठी ३५० कोटी रुपयांचा निधी आणल्याचे सत्ताधारी सांगत आहेत. मात्र, रस्त्यांची अवस्थेची पाहणी त्यांनी करावी, असा टोला उपरकर यांनी लगावला. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या उमेदवारांसह अन्य उमेदवारांनी या मतदार संघातील मतदारांसाठी निकष लावून १०००, २०००, ५००० रुपये प्रमाणे पैशांचे वाटप करण्यात आल्याचा गौप्यस्फोट उपरकर यांनी केला.

या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या खा. विनायक राऊत यांनी मागील १० वर्षांत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केंद्र सरकारशी निगडित असलेले प्रश्‍न सोडवले नाहीत. तसेच केंद्रातील सरकारमध्ये नारायण राणे हे मंत्री असताना देखील त्यांनी जिल्ह्यात एकही उद्योग व व्यावसाय आणला नाही, अशी टीका त्यांनी केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!