19.4 C
New York
Saturday, May 18, 2024

Buy now

रस्त्यालगत काम सुरू असताना जेसीबीला दुचाकीची धडक ; एक जखमी

कणकवली : तालुक्यातील फोंडा येथे एका दुचाकी स्वाराचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी येथील रुग्णालय दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडला. मात्र दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने जीवितहानी टळली.

मात्र दुचाकीचे नुकसान झाले. फोंडा येथे रस्त्यालगत जेसीबी काम करत असताना एका दुचाकीची जेसीबीला धडक बसली. यात एक दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस प्रकाश गवस यांनी घटनास्थळी धाव घेतली  यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. मात्र तो दुचाकीस्वार हा तेथील असल्याचे सांगण्यात आले. पोलीस ठाण्यात या अपघाताची उशिरापर्यंत नोंद नव्हती.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!