वेंगुर्ले : भारतीय लोकरंगभूमीचे एक अनमोल लेणे म्हणून प्रसिद्ध असलेल्या कनार्टकातील यक्षगान हा नाट्यप्रकार रविवार दि. १२ मे रोजी सायंकाळी ७ वाजता कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात मराठीतून सादर होणार आहे. या नाटकासाठी महाभारतातील एका महत्त्वाच्या भागावर ‘चक्रव्यूह‘ हे कथानक निवडले आहे.
‘चक्रव्यूह‘ या नाटकाचे संवाद गुरू संजिव सुवर्णा यांनी लिहिले आहेत.तर सावंतवाडी येथील प्रा.विजयकुमार फातर्पेकर यांनी त्याचा मराठीत अनुवाद केला आहे.‘चक्रव्यूह‘ हे नाटक यक्ष संजीव यक्षगान केंद्र, उडुपी येथील गुरू संजिव सुवर्णा आणि त्यांचे शिष्यगण सादर करणार आहेत.तरी रसिकांनी यावेळी उपस्थित रहावेअसे आवाहन नाईक मोचेमाडकर पारंपारिक दशावतार लोकनाट्य मंडळाचे
मालक तुषार नाईक यांनी केले आहे.