26.4 C
New York
Saturday, September 14, 2024

Buy now

निवडणुकीत निवडणूक विभागाच्या प्रायव्हेट गाड्यांवरील ड्रायव्हर मतदानापासून वंचित

प्रशासनाच्यावतीने त्यांना मतदान करण्यासाठी यंत्रणा राबविण्यात यावी

कणकवली | मयुर ठाकूर : निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र कणकवली तालुक्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निवडणूकसाठी ज्या प्रायव्हेट गाड्या प्रशासनाच्यावतीने नेमण्यात आल्या होत्या त्या गाड्यांवरील वाहनचालकांना मतदान करण्यासाठी वेळ दिला नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याबाबत भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष सुरेंद्र उर्फ आण्णा कोदे, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, स्वप्निल चिंदरकर, समीर प्रभुगावकर, अजय गावकर, निखिल आचरेकर यांनी कणकवली येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, कणकवली चे जगदीश कातकर यांची भेट घेऊन निवेदन देऊन लक्ष वेधले आहे. तसेच त्यांना त्या वाहनचालकांना मतदान करता यावे यासाठी पुन्हा यंत्रणा राबवावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कणकवली तालुक्यातील प्रशासनाच्या वतीने नेमण्यात आलेल्या भाड्याच्या गाड्यांवरील ड्रायव्हर आपल्या इलेक्शन ड्युटीवर असल्याने त्यांची पर्यायी व्यवस्था मतदानासाठी झाली नाही. असे अनेक जन मतदानापासून वंचित राहिले आहेत. एकीकडे शासन निवडणूक विभागाच्या वतीने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्यावर शासनाने विविध कार्यक्रम देखील घेतले होते. असे असताना देखील कणकवली तालुक्यातील आपल्या निवडणूक विभागाच्या संबधित असलेल्या भाड्यांच्या गाड्यांवरील ड्रायव्हर मतदानापासून वंचित राहिल्याचे दिसून येत आहेत. तरी आपल्या प्रशासनाच्या वतीने त्यांना मतदान करण्यासाठी यंत्रणा राबवावी हि विनंती.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!