19.4 C
New York
Saturday, May 18, 2024

Buy now

डोंगरपाल माऊलीचा आज वर्धापन दिन सोहळा

बांदा : डोंगरपाल येथील श्री देवी माऊलीचा वर्धापन दिन सोहळा शुक्रवारी ( आज ) १० मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता गणपती पूजन, सर्व देवतांची पूजा, होमहवन, देवीयाग, अभिषेक व पूजा आदी कार्यक्रम होतील.

सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. महाआरती, गाऱ्हाणे, ओट्या भरणे, नवस बोलणे – फेडणे, तीर्थप्रसाद व १ वा. महाप्रसाद होईल. सायंकाळी स्थानिकांची भजने होतील. रात्री ९.३० वा. श्री देवी माऊली दशावतार नाट्य मंडळ डोंगरपाल यांचा ‘ब्राम्हणकन्या अर्थात अकलासुर वध’ हा नाट्यप्रयोग होईल. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त डोंगरपाल ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!