22 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

लोकसभा निवडणूकीसाठी ३३२ मतदान केंद्रांवर होणार मतदान

निवडणूक अधिकारी कर्मचारी मतपेट्या घेऊन मतदान केंद्रावर रवाना

कणकवली : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी ७ मे रोजी मतदान होणार आहे. ३३२ मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून सोमवारी २० टेबलवरून मतदानासाठी लागणारे साहित्य वाटप करण्यात आले. ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी, मायक्रो ऑर्ड्सवर, केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस मिळून २३२४ कर्मचारी नेमणूका करण्यात आल्या आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी व लहान मुलांसाठी पाळणाघराची विशेष व्यवस्था करण्यात आली असून कर्मचारी मतदान साहित्य घेवून ४५ एसटी, ५ जीप गाड्यांच्या मदतीने कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यातील विविध मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत.

कणकवली महाविद्यालयाच्या पटांगणावर मतदान साहित्य वाटप प्रक्रीया सोमवारी पार पडली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर, कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे, वैभववाडी तहसिलदार सूर्यकांत पाटील, देवगड तहसिलदार संकेत यमगर आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव यांनी भेट देऊन प्रक्रियेची पाहणी केली. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. मतदान प्रक्रीया शांततेत पार पडावी यासाठी सर्वोतोपरी काळजी घेण्यात येत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!