भाजपा जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर यांची जोरदार टीका
मालवण : किल्ले सिंधुदुर्ग येथे उभारणी प्रस्तावित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या खा. विनायक राऊत यांना शिवप्रेमी जनता मतदानातून योग्य ते उत्तर देत घरी बसवणारच. असा जोरदार प्रहार भाजपा जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर यांनी केला.
दरम्यान, भाजपा महायुती अपेक्षेपेक्षा जास्त मताधिक्य मिळवेल. राणे साहेब मोठ्या मताधिक्यासह विजयी होतील. असा विश्वासही बाबा मोंडकर यांनी व्यक्त केला.मालवण भाजपा कार्यालय येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी भाजपा पदाधिकारी भालचंद्र राऊत, माजी नगरसेवक पंकज सादये उपस्थित होते.
बाबा मोंडकर म्हणाले, खा. विनायक राऊत यांच्याकडे कोणतेही विकासाचे व्हिजन नाही. केवळ टीका करायच्या, अफवा पसरवायाच्या आणि जनतेची दिशाभूल करायची. एवढेच काम विनायक राऊत यांनी आजपर्यंत केले.जागतिक स्तरावर दखल घेण्यात आलेला नेवी डे हा दैदिप्यामान सोहळा मालवण किनारपट्टीवर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत साजरा झाला. या निमित्ताने आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग येथे केली जाणार होती. मात्र विनायक राऊत यांनीच या ठिकाणी होणाऱ्या पुतळ्याला विरोध केला. तेथील जमिन मालकांना दिशाहीन केले. आम्ही सर्व शिवप्रेमी किल्ले सिंधुदुर्ग याच ठिकाणी महाराजांचा पुतळा उभारणी व्हावा. ही ठाम भुमिका मांडत असल्याने त्यावेळी राऊत यांच्यासोबत फोनवर झालेल्या चर्चेतही त्यांची विरोधी भुमिका स्पष्टपणे दिसून आली. आपण या विषयात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी महाराज्यांच्या विचारधारेतील आपल्या महाराष्ट्रात अश्या प्रकारचा विरोध चुकीचा असल्याचे सांगूनही त्याची विरोधी भुमिका कायम राहिली. हे दुर्दैव म्हणवे लागेल. असेही मोंडकर यांनी सांगितले.
मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भाजपा महायुती शासनाच्या माध्यमातून दिमाखदार पणे किल्ले राजकोट येथे विक्रमी कालावधीत उभारणी करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. हा सोहळाही अपूर्व असाच ठरला.
हे सर्व होत असताना सातत्याने विरोधाची भुमिका बजावत विकासाचे कोणतेही व्हिजन नसलेले खासदार ही विनायक राऊत यांची ओळख प्रखर्षाने जनतेसमोर आली. या सर्वांचे उत्तर जनता या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांना मतपेटीतून देणारच. असेही मोंडकर यांनी सांगितले.
केंद्र शासनाने सागरी पर्यटन वाढीसाठी स्थानिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध व्हावे यासाठी स्वदेश दर्शन 2 ही नवी योजना आणली. देशातील 58 जिल्ह्याची निवड होत असताना सिंधुदुर्ग जिल्हाला यात स्थान देण्यात आले. ही योजना कार्यान्वित झाली. मात्र बाबत विनायक राऊत यांना खा. असून माहिती नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. त्यामुळे गतिमान विकासाचे व्हिजन केंद्रस्थानी ठेवत जनता भाजपा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार ना. नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करेल. असा विश्वासही बाबा मोंडकर यांनी व्यक्त केला.