22 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

शुभ बोल नाऱ्याने मला अडविण्याची व धमकीची भाषा वापरून नये, तसा प्रयत्न त्यांनी केला तर त्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही – उद्धव ठाकरेंचा थेट राणेंना इशारा

कणकवली | मयुर ठाकूर : मी माझे वडील बाळासाहेब ठाकरे यांच्या नाव वापरून मते मागत आहेत. मोदी-शहा यांनी आपल्या वडिलांचे नाव वापरून मते मागावित. भाजप हा बेअकली पक्ष आहे. या बेअकली पक्षाचे शहा सरदार आहेत. मोदी-शहा यांनी मागील 10 वर्षांत देश लुटला. इंडिया आघाडीचे सरकार आल्यास या लुटारूंकडून सर्व वसूल केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. शुभ बोल नाऱ्याने मला अडविण्याची व धमकीची भाषा वापरून नये, तसा प्रयत्न त्यांनी केला तर त्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. 2024 लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा देणाऱ्या मोदी-शहांच्या भाजपाला जनता राजकीयदृष्ट्या तडीपार करेल. महाराष्ट्रातील जनता मशालीची धग काय असते ती भाजपला दाखवून देईल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक करतानाच मोदी, शहा, राणे व भाजपवर ठाकरे शैलीत प्रहार केले. अमित शहांनी आपल्या सभांमध्ये बाळासाहेब नव्हे तर हिंदूहृदयासम्राट बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख करावा, असे ठाकरेंनी ठणाकवून सांगितले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ येथील उपजिल्हा रुग्णालयात समोरील मैदानावर शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री यांची जाहीर सभा आयोजित केली होती. याप्रसंगी श्री. ठाकरे बोलत होते. यावेळी शिवसेनेचे नेते तथा आमदार अनिल परब, उपनेते गौरीशंकर खोत, नेते अरविंद भोसले, उद्धव ठाकरे यांचे स्वीयसहाय्यक मिलिंद नार्वेकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, माजीमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काॅग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कोकण विभागीय संघटक अर्चना घारे-परब, सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परुळेकर, महिला आघाडीप्रमुख नीलम सावंत-पालव, जान्हवी सावंत, प्रदीप बोरकर, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, नीलेश गोवेकर, डाॅ. प्रथमेश सावंत यांच्यासह मविआचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. ठाकरे म्हणाले, शुभ बोल नाऱ्या कोणाला धमक्या व कोणाला अडविण्याची भाषा करीत आहे. बाळासाहेबांनी याच नाऱ्याला शिवसेनेतून गेट आऊट केले होते. रमेश गोवेकर, अंकुश राणे कुठे गेले, त्यांच्या हत्या झाल्या कशा? नाऱ्या भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांचे शुद्धीकरण केले गेले का ? पण लोकांच्या मनात आजही शिवसेना कायम आहे. भाजपला राणे पित्रा-पुत्राची घराणेशाही मान्य आहे काय? अमित शहा तुमच्या सर्टिफिकेटची मला मला गरज नाही. मोदी-शहांनी माझ्या वडिलांचे नाव घेऊन निवडणूक जिंकण्यापेक्षा तुमच्या वडिलांचे नाव घेऊन निवडणुका जिंकून दाखव्याव्यात. महाराष्ट्राच्या विरोधात भूमिका घ्याल तर याद राखा. मोदी-शहा यांच्या भाजपाला महाराष्ट्राबद्दल आकास असून त्याचा सुड देशात राजकीय परिवर्तन झाल्यानंतर घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

विनायक राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील 16 प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने गुजरातला पळवले. कोकणाचा विनाश करणार रिफायनरी प्रकल्प लादण्याचे काम महायुती व भाजपकडून सुरु आहे. हा प्रकल्प कोणत्याही परिस्थिती मी होऊ देणार नाही. सिडकोच्या माध्यमातून कोकणातील जमिनी परप्रांतियांच्या ताब्यात देण्याचा महायुती व भाजपचा कट आहे. मी तसे होऊ देणार नाही. नारायण राणे यांचा दोन वेळा पराभव झाला. आता तिसऱ्यांदा राणेंचा कोकणातील जनता पराभव करून मला विजयी करणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांनी कणकवली पहिली सभा घेतली तेव्हा 1.5 लाखांच्या मताधिक्यांनी निवडून आलो होतो. दुसऱ्यांदा सभा घेतली तेव्हा 1.75 लाखांच्या मताधिक्यांनी निवडून आलो होतो. ठाकरे हे तिसऱ्यांदा सभा घेत असून अडीच लाखांच्या मताधिक्यांनी मी निवडून येणार आहे, असा दावा त्यांनी केला. कोकण व शिवसेनेचे अतूट नाते आहे. राणे पित्रा-पुत्र मला गेल्या 10 वर्षांत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात विकासात्मक कामे केली, असा प्रश्न मला विचारात आहेत. मात्र, राणेंनी 35 वर्षांत काय केले याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे. राणेंनी साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात 9 राजकीय हत्या केल्या. राणे पिता – पुत्रांची गुंडागिरी वाढली असून ही गुंडगिरी गाडून टाकण्याची संधी निवडणुकीच्या निमित्ताने कोकणवासीयांना मिळाली आहे, या संधीचे कोणवासीयांनी सोने करून राणेंना तडीपार करा, असे आवाहन राऊतांनी केले. उद्घव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी सिंधुदुर्गासाठी शासकीय मेडिकल महाविद्यालय मंजूर केले. हे महाविद्यालय उभारण्यासाठी 966 कोटींची निधी दिला. जिल्ह्यासाठी मंजूर झालेली कॅब लॅब राणेंनी आपल्या मेडिकल काॅलेजमधील लॅब चालावी याकरिता सदर लॅब सोलापूरला पाठवली. यावरून राणे हे स्वतःच्या फायद्यासाठी जनतेच्या आरोग्यशी खेळत आहेत, असा आरोप त्यांनी केले.
आमदार वैभव नाईक म्हणाले, नारायण राणे हे दोन वेळा राज्यात मंत्री असताना त्यांचा जनतेने पराभव केला. आता केंद्रीयमंत्री नारायण राणे असून त्यांना तिसऱ्यांदा पराभव अटळ आहे. सिडकोचे नवे दुखणे कोकणावर लावले जात आहे. 8 हजार कोटींचे अर्थबळ असलेल्या भाजपच्या विरोधात आम्ही लढतोय. शिवसेना कोणाची आहे ही येथे जमलेल्या गर्दी पाहून बोलावे, असा टोला नाईकांनी विरोधकांना लगावला. उद्धव ठाकरे हे माझे प्रेरणास्थान आहे. भाजपने राणेंचा अवस्था वाजली तर पुंगी नाही तर गाजर अशी केली आहे, अशी कोपरखळी नाईकांनी मारली.
दीपक केसरकर हा दलबदलू माणूस आहे, अशी टीका प्रवीण भोसले यांनी केले. भाजप हा संविधान विरोधी पक्ष आहे. त्यामुळे लोकशाही व संविधान वचाविण्यासाठी जनतेने भाजपला पराभूत करावे, असे आवाहन कमलताई परुळेकर यांनी केले. देशात इंडिआ आघाडीचे सरकार आल्यास महागाई, गरीबी, बेरोजगारमुक्ती देणार आहे. देशात जर मोदींचे पुन्हा सरकार आल्यास हुकूमशाही येणार आहे. याचा विचार जनतेने केला पाहिजे, साक्षी वंजारे म्हणाल्या.

गुहागारमध्ये नीलेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन आमदार भास्कर जाधव यांच्यावर अश्लील शब्दांत टीका केली. नीलेश राणेंनी आपल्या भाषणात वापरलेली भाषा जनता विसरलेली नाही. नारायण राणेंनी आपल्या मुलांवर हेच संस्कार केले का ?असा सवाल शिवसेनेचे नेते अरविंद भोसले यांनी केला. सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, सुशांत नाईक, विवेक ताम्हणकर, अमित सामंत, बबन साळगावकर यांनी नारायण राणे व दीपक केसरकर यांच्यावर हल्लाबोल करताना रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय शांतात नांदण्यासाठी विनायक राऊतांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. या सभेला मोठ्या संख्येने मविआचे कार्यकर्ते व जनसमुदाय उपस्थित होता.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!