आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला धक्का
तोंडवली बावशी बोभाटेवाडीतील उबाठा सैनिकांनी केला भाजपात प्रवेश
कणकवली | मयुर ठाकूर : कणकवलीत उबाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा सुरू असताना उबाठा सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला. एकीकडे जाहीर सभा तर दुसरीकडे जाहीररीत्या पक्षप्रवेश असे चित्र आज कणकवलीत पहावयास मिळाले. तोंडवली बावशी बोभाटेवाडी येथील शिवसैनिकांनी हा पक्षप्रवेश केला.
भाजप मध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये,ज्ञानेश्वर मोर्ये, सत्यवान मोर्ये, विठ्ठल मोर्ये , प्रमोद मोर्ये, चंद्रकांत बोभाटे, स्नेहा मर्ये, संजना मर्ये, मनिप्पा आवळे, सदानंद आवळे, पूर्वा मर्ये, सौरभ बोभाटे राजेश बोभाटे प्राजक्ता मर्ये समता मर्ये आदी शिवसैनिकांचा समावेश आहे.