26 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

उद्धव ठाकरे हा गद्दार व बेईमान माणूस ;उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी खरा चेहरा दाखविला

भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांची घणाघाती टीका

वडिलांचे,भावाचे झाले नाहीत ते शिवसैनिकांचे होऊ शकत नाहीत

निवडणूक आयोगावर टीका करून संजय राऊत यांनी अकलेचे तारे तोडू नयेत

उद्धव ठाकरेची सभा घ्याच,आम्हाला शिव्या घाला, मग जनताच भाजप च्या मताधिक्यात एक लाखाने वाढ करणार

कणकवली | मयुर ठाकूर : उद्धव ठाकरे हा गद्दार व बेईमान माणूस आहे. ज्यांनी आपल्या वडिलांना सोडले नाही. रक्ताच्या भावाशी बेईमानी केली. स्व.बाळासाहेबांच्या विचारांशी, त्यांच्या शिवसैनिकांशी बेईमानी केली. मराठी माणसासोबत बेईमानी केली.त्यांचा खरा चेहरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. एका तोंडाने शिवसेनेकांना मुख्यमंत्री करायचे म्हणून सांगायचे आणि घरातील माणूस मुख्यमंत्री होत नसेल तर आपल्याच शिवसैनिकांना मुख्यमंत्रीपदापर्यंत जाऊ द्यायचे नाही.असे कृत्य उद्धव ठाकरे यांनी केले असल्याची घनाघाती टीका भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी केली.

कणकवलीत प्रहार भवन येथे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला यावेळी ते म्हणाले,प्रत्येक गोष्टीवर संशयाने पाहन ही संजय राऊत ची रोजची सवय झाली आहे. निवडणूक आयोगाला सल्ले आणि त्यांचेवर आरोप करून उगाचच अकलेचे तारे संजय राऊत तोडत आहे.मतदार कधी मतदान करतात हे ज्याला माहीत नाही. त्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही.

दिशा सालीयन चा पोस्ट मॉर्टमरिपोर्ट योग्य वेळी का आला नाही. हा प्रश्न आम्ही विचारायचा का ? उगाच अकलेचे तारे तोडू नको. मतदान कस असत हे आधी शिकून घेतलं पाहिजे.फडणवीस साहेबांना फुसकाबार बोलण्याचा अधिकार चायनीज फटाका जो वाजत नाही त्या संजय राऊत ला नाही. याची वात पेटवायची कुठुन आणि रॉकेट सुटणार कुठून हा प्रश्न संजय राऊत ला बघितलं की पडतो त्याने देवेंद्र जी फडणवीस यांचेवर बोलू नये.जो विषय काल फडणवीस साहेबांनी सांगितला त्यावरून हे समजत की उद्धव ठाकरे किती नीच आहे.उद्धव किती स्वार्थी आहे.नीच आहे याचं उत्तम उदाहरण फडणवीस साहेबांनी दाखवलं.ह्याला शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी काही देणं घेणं नाही. उद्धव ठाकरेंचा घाणेरड्या वृत्तीचा चेहरा फडणवीस साहेबांनी समोर आणला.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत वातावरण आमच्या साठी सकारात्मह आहे. उद्धव ठाकरेच्या स्वभा प्रमाणे कणकवलीत येवून जाहीर सभा घ्यावी.राणे साहेब आणि आम्हाला,भाजप नेत्यांना शिव्या द्याव्यात मग आमचे एक लाख मतदान वाढणार हे नक्की आहे.या पूर्वी सुद्धा तसेच कले होते माझ्या विधानसभेला तेव्हा ५० हजार मते वाढली होती . ठाकरेंनी आम्हाला शिव्या दिल्या म्हणून जनतेने रागाने आम्हाला मते दिली होती. यावेळी सुद्धा तसेच होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेण्यासाठी यावे हवं तर मी त्यांना हेलिकॉप्टर करून देतो,रेल्वेचे तिकीट काढून देतो अशी उपरोधिक टीका आमदार निदेश राणे यांनी केली.

उद्धव ठाकरे बेईमान माणूस आहे. गद्दार आहे. बावनकुळे जे म्हणतात ते खरं आहे. निवडणूक आयोग स्वतंत्र आहे.आणि कोण कोणाच्या हाताखाली बाहुली आहे. हे सिल्वर ओक वर हुजरे हिरी करणाऱ्यांनी सांगू नये.सिल्वर ओक वर समजेल बाहुली कशी नाचते. हयाचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय राऊत आहे अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!