13 C
New York
Sunday, October 13, 2024

Buy now

रत्नागिरी – सिंधुदुर्गच्या लोकसभा सोशल मीडिया निरीक्षक पदी विकास पवार यांची नियुक्ती

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली नियुक्ती

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : सध्या महाराष्ट्रसह देशभरात मोठ्या प्रमाणात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्याच धर्तीवर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा सोशल मीडिया निरीक्षक पदी विकास पवार यांची निवड केली आहे. विकास पवार यांचे सोशल मीडियावरील कामही उल्लेखनीय असल्याने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

तसेच रायगड लोकसभा मतदार संघात श्रीमती जानव्ही पारेख, धाराशिव मतदारसंघात सागर फुंडक, लातूर मतदारसंघात अरुण मुंढे, बारामती मतदारसंघात सुधाकर पडोळे, कोल्हापूर श्रीमती संजीवनी पांडे, हातकणंगले मतदारसंघात जयकिशन हेडाऊ, सांगली मतदारसंघात श्री राज यादव, सातारा मतदारसंघात ऍड. बाळकृष्ण कायपेलवार, माढा मतदारसंघात आनंद खजांन्ची, सोलापूर मतदारसंघात अक्षय जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!