20.7 C
New York
Wednesday, September 17, 2025

Buy now

ठाकरेंच्या सभास्थळी राणेंनी येऊनच दाखवावे – सुशांत नाईक यांचे प्रतिआव्हान

कणकवली : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शुक्रवार ३ मे रोजी कणकवलीत जाहीर सभा होणार आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या निवासस्थानपासून काही अंतरावर होणाऱ्या ठाकरेंच्या सभेला हिम्मत असेल तर राणे व त्यांच्या बगलबच्चांनी येऊन दाखवावे, असे प्रतिआव्हान युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिले आहे.

उद्धव ठाकरेंना धमकी देणारे नारायण राणे हे त्यांच्या बगलबच्चांसह सभास्थळी येऊ शकतात. राणेंच्या या आव्हानाला शिवसैनिक पुरेसे आहेत, असा इशारा श्री. नाईकांनी दिला आहे. या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा दारूण पराभव होणार आहे. विनायक राऊत यांचा विक्रमी मताधिक्यांनी विजय होणार आहे. राऊत यांची प्रचार यंत्रणा शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक राबवित आहेत. खळा बैठक व अन्य सभा मिळून आतापर्यंत २०० हून अधिक सभा घेण्यात आल्या आहेत. घरघरांत मशाल चिन्ह पोहोचवण्याचे काम शिवसैनिक करीत आहेत. त्यामुळे राऊत यांचा अडीच लाखाच्या मताधिक्यांनी विजय होणार असल्याचा दावा नाईक यांनी केला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!