9.8 C
New York
Thursday, November 13, 2025

Buy now

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसचा स्वबळाचा निर्धार

नगराध्यक्षपदासह सर्वच जागांवर काँग्रेस लढणार

पक्ष निरीक्षक ऍड. तौफिक मुलाणी यांची घोषणा

कणकवली :
कणकवली नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसने स्वबळाचा झेंडा उभारला आहे. नगराध्यक्ष पदासह सर्व नगरसेवक पदांच्या जागांवर काँग्रेस हाताच्या निशाणीवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस व पक्ष निरीक्षक ऍड. तौफिक मुलाणी यांनी दिली.

कणकवली काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत निरीक्षक प्रवीण वरुणकर, तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, शहराध्यक्ष अजय मोरये, वैभववाडी तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव, कोल्हापूरचे पदाधिकारी पांडुरंग पाटील-कावणेकर, तसेच शांताराम नेवरेकर, महेश तेली, प्रमोद घाडीगावकर आणि अमित मांडवकर उपस्थित होते.

मुलाणी म्हणाले, कणकवली नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांची ठाम भावना असून, हाताच्या निशाणीवरच जनता पुन्हा विश्वास दाखवेल, याची आम्हाला खात्री आहे.

नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर हे इच्छुक असल्याची माहितीही मुलाणी यांनी दिली. स्थानिक कार्यकर्त्यांचा जोश, संघटनाची ताकद आणि पक्षाचे विचारधन या जोरावर काँग्रेस कणकवलीत मजबूतपणे लढणार आहे, असे ते म्हणाले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!