24.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

कणकवली नगरपंचायतच्या वतीने शहरात मतदान जनजागृती

कणकवली : रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुषंगाने मतदान जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आज कणकवली शहरात नगरपंचायत तर्फे जनजागृती करण्यात आली. तसेच मतदारांसाठी सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली. कणकवली नगरपंचायत मार्फत मतदान जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. त्यामध्ये १० एप्रिल ते १९ एप्रिल या दरम्यान मतदार सेल्फी पॉईंट हा उपक्रम, मतदार हस्ताक्षर अभियान शहरामध्ये विविध ठिकाणी राबविण्यात आले आहेत.

सदर जनजागृती कार्यक्रमाकरीता बचत गटाच्या महिला, विद्यार्थी, नागरिक, कर्मचारी व इतर यांनी देखील सहभाग दर्शविला असून त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कणकवली नगरपंचायत कार्यालय, पटवर्धन चौक, पटकीदेवी मंदिर नजिक बाजारपेठ, प्रांत कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, एस.टी.स्टँण्ड, पोदार इंटरनॅशनल स्कूल, टेंबवाडी व कणकवली कॉलेज अशा शहरातील विविध ठिकाणी मतदार शपथ कार्यक्रम घेण्यात आले आहेत. सदर ठिकाणी मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले.

शहरात रेल्वे स्टेशन जवळ, आप्पासाहेब पटवर्धन चौक, श्रीधर नाईक पुतळ्या जवळ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कणकवली कॉलेज, बस स्टँण्ड जवळ, बांधकरवाडी बसा स्टॉप जवळ, पटकीदेवी मंदिर जवळ व गांगोमंदिर जवळ या ठिकाणी बॅनर उभारून देखील मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!