रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं. चिपळूण-गुहागर बायपास रस्त्यावर एका दुचाकीचा अपघात झालेला पाहून त्यांनी आपला ताफा थांबवला आणि स्वतः अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी धावले.
रस्त्यावर एक दुचाकीस्वार जखमी अवस्थेत पडलेला होता. हा अपघात पाहताच ना. राणे यांनी तात्काळ आपल्या सुरक्षा रक्षकांना मदतीसाठी पुढे पाठवले. त्यांनी स्वतः लक्ष घालून रुग्णवाहिकेला बोलावून घेतले. जखमी व्यक्तीला त्वरीत रुग्णालयात हलवून त्याच्यावर योग्य उपचार सुरू होतील, याची त्यांनी खात्री केली.
मंत्रिपद कितीही मोठं असलं तरी माणूस म्हणून असलेली संवेदनशीलता किती महत्त्वाची असते, हेच एक जबाबदार मंत्री म्हणून ना. नितेश राणे यांच्याबाबत या घटनेतून दिसून आलं आहे.