17.9 C
New York
Saturday, May 18, 2024

Buy now

कणकवली विद्यानगर येथे चोरट्यानी फ्लॅट फोडला

कणकवली : कणकवली विद्यानगर येथील डिचोलकर बिल्डिंग मधील बंद फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यानी फ्लॅटमधील ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सोमवारी रात्री ८.३० ते मंगळवारी सकाळी ९ वा.च्या दरम्यान घडली आहे. याबाबतची खबर फ्लॅटमध्ये राहत असलेले डॉ. विकास एनएम यांनी पोलिसांना दिली. चोरीची माहिती मिळताच कणकवली पोलीस तसेच श्वान पथक व ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल झाले होते.

डॉ. विकास एनएम विद्यानगर येथील खाजगी रुग्णालयात कामाला आहेत. ते सध्या राहत असलेला फ्लॅट हा त्यांना खाजगी रुग्णालयातून देण्यात आला आहे. सोमवारी त्याची रात्रपाळी असल्यामुळे ते रात्री ८.३० वा.च्या सुमारास कामाला गेले. त्यांची ड्युटी संपल्याने ते सकाळी ९ वाजताच्या सुमारास फ्लॅटवर आले असता त्यांना दरवाजाची कडी कोयंडा तुटलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यामुळे त्यांनी फ्लॅट मध्ये प्रवेश करून पाहिले असता रूमवरील सर्व साहित्य अस्ताव्यवस्थेची पडले होते, तसेच रूम मधील कपाटही उघडे होते. त्यामुळे त्यांनी कपाट तपासले असता त्यामधील १५ हजार रुपयांची रोख रक्कम व ३० हजार रुपये किमतीची एक तोळे सोन्याची चैन निदर्शनास आली नाही. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश शेडगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर के उबाळे, हवालदार विनोद सुपल हे घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. तसेच श्वान पथकालाही प्राचारण करण्यात आले होते. चोरी केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास कणकवली पोलीस करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!